मुलांत शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे मोलाचं कार्य शिक्षक वर्ग करतो : माजी सरपंच विलास परब

तळवडे शारदा विद्यामंदिर शाळा नंबर ४ मुख्याध्यापक किशोरी बुगडे सेवा निवृत्त समारंभ प्रसंगी व्यक्त केले मत

सावंतवाडी : लहान मुलांत शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे मोलाचे कार्य शिक्षक वर्ग करतो. कारण प्राथमिक शाळेतील लहान मुलांना योग्य दिशा मार्गदर्शन देण्याचे कार्य शिक्षक करत असतो, असे आदर्शवत व्यक्तीमत्व तळवडे शारदा विद्यामंदिर शाळा नंबर ४ मुख्याध्यापक किशोरी बुगडे याच्या सेवानिवृत्त समारंभ आयोजित केला होता, यावेळी तळवडे गावचे माजी सरपंच विलास परब यांनी या कार्यक्रम प्रसंगी मत व्यक्त केले. यावेळी शारदा विद्यामंदिर शाळा नंबर ४ चे पालक तसेच शिक्षक वर्ग, विद्यार्थी यांच्यावतीने निवृत मुख्याध्यापिका किशोरी बुगडे याचा निवृत सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर, माजी सरपंच विलास परब, ग्रामपंचायत सदस्य दादा परब, प्रसाद नागडे , यशवंत गोडकर, मुख्याध्यापक प्रतिक्षा केसरकर, शिक्षक नीलिखा गवडळकर, विकास नाईक, आपा परब, हरी परब, रविंद्र सावंत, ज्ञानेश्वर बर्डे, ग्रामपंचायत सदस्य अंकिता भेरे, अजित गावडे, नमिता परब, पालक तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक विकास नाईक यानी केले यावेळी पालकवर्ग याच्या वतीने निवृत मुख्याध्यापिका किशोरी बुगडे याचा निवृत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: