मुक्ताई अॅकेडमीतर्फे कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी: मुक्ताई अॅकेडमीतर्फे कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त 19 वर्षे वयोगटातील मुलां-मुलींसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविदयालयातील स्पोर्ट्स काँम्प्लेक्स हाॅलमध्ये सकाळी 10.00 वाजता उदघाटनाला सुरुवात करण्यात आली.स्पर्धेत सहा गट असुन विजेत्यांसाठी रु.5,500 रकमेची 20 बक्षिसे,5 ट्राॅफीज,15 मेडल्स आणि प्रशस्तिपत्रं देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले, प्रमुख पाहुणे आयुर्वेदाचार्य डाॅ.संजीव गवंडे, राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू कु.बाळकृष्ण पेडणेकर, सिधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सुर्यकांत पेडणेकर,कणकवलीतील विनर ट्राॅफी हाऊसचे महेंद्र चव्हाण, नॅशनल आर्बिटर श्रीकृष्ण आडेलकर, अॅकेडमीच्या संचालिका सौ.स्नेहा पेडणेकर, संचालक कौस्तुभ पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कोविड कालावधीत आणि गेली 30 ते 35 वर्षे दुर्गम ग्रामीण भागात वैदयकीय सेवा देणारे सत्कारमूर्ती डाॅ.संजीव गवंडे यांचा मुक्ताई अॅकेडमीतर्फे राणीसाहेबांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे शालेय स्पर्धांमध्ये राष्ट्रीय निवड चाचणीसाठी तीनवेळा निवड झालेला आणि जगज्जेता भारतीय खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्या कोचिंग कँपमध्ये दोनशे खेळाडूंमध्ये निवडला गेलेला कोकणातील एकमेव खेळाडू सतरा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू कु.बाळकृष्ण पेडणेकर याला मुक्ताई अॅकेडमीतर्फे राणीसाहेबांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गौरवपत्र आणि गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे डाॅ.संजीव गवंडे यांनी मुलांना बुदधिबळाचे फायदे सांगतानाच त्याचा अभ्यासासाठी होणारा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.मुक्ताई अॅकेडमी विदयार्थ्यांसाठी करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करतानाच मुलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव करावं अशी इच्छा व्यक्त केली.
राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले यांनी मुलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना मुक्ताई अॅकेडमीच्या पाठीशी वेळोवेळी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे म्हटले.
राणीसाहेब आणि डाॅ.संजीव गवंडे यानी बुदधिबळ बोर्डवर चाल खेळुन स्पर्धेचे उदघाटन केले.
सुत्रसंचालन अॅकेडमीची विदयार्थिनी कु.पल्लवी निरावडेकर हीने केले.

रामचंद्र कुडाळकर,सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: