मुक्ताईनगरचा वाघ आमच्या सोबत, उद्या कशाला आताच सरकार पाडून दाखवा – उध्दव ठाकरे

जळगाव : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मतमतांतरे  आणि त्यांच्या वाढत चाललेल्या चढा ओढीनंतर राज्यात ऑपरेशन लोटस सुरु झाल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खुलं आव्हान दिलयं. उद्या कशाला आताच सरकार पाडून दाखवा , मुक्ताईनगरचा वाघ आमच्या सोबत आहे अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.  जळगाव इथल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

आव्हानं स्वीकारणं हा शिवसेनेचा धर्म असून गेली २०-२५ वर्षात ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी विश्वासघात केला मात्र ज्यांच्या विरोधात लढलो त्यांनी खरा विश्वास दिला असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, जळगाव

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: