मुंबईत क्वारंनटाईन सेंटरमध्ये ‘कोरोना का कमिशन’

मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये मुंबईतील क्वारंटाईन सेंटर्सची कंत्राटे मिळवण्यासाठी स्पर्धा लागली असून यामध्ये कंत्राटदार मालामाल होत असले तरी कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. क्वारंटाईन सेंटर्सशी संबंधित कंत्रांटांमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा होत आहे, असा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी केला.

ते म्हणाले की, विविध क्वारनटाईन सेंटरमध्ये कंत्राटदारांना वेगवेगळे दर आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. क्वारंनटाईन सेंटरमध्ये रुग्णांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्ट्यासाठी कंत्राट दिले असले तरी यासाठी आकराण्यात आलेले दर मात्र सारखे नाहीत. यात मुंबईच्या पूर्व उपनगरात १७२ रुपये, दादर धारावीसारख्या परिसरात ३७२ रुपये, अंधेरी जोगेश्र्वरीत ३५० रुपये तर ठाण्यात ४१५ रुपये इतका दर आकारण्यात येत आहेत. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असले तरी त्या परिस्थितीतही खाबूगिरी चालू असल्याचे दिसते.

क्वारंनटाईन सेंटरमधील जेवणाच्या वाईट दर्जामुळे कोरोना रुग्णांना त्रासाला तोंड द्यावे लागत असतानाच असतानाच कंत्राटदारांची कशी चलती सुरु आहे हे सुध्दा आता उघड झाले आहे. मुंबईतल्या क्वारनंटाईन सेंटरमधील कंत्राटदारांबाबतचे एक धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची आपली मागणी असल्याचे किरीट सोमैया म्हणाले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: