मालवणात दोन व्यापाऱ्यांसह पाच पॉझिटिव्ह

भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस बाबा परब यांचा समावेश

मालवण : मालवण शहरात बुधवारी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. यामध्ये दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस बाबा परब याना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी अलीकडेच मुंबई प्रवास केला होता.
मालवण शहरात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून प्रामुख्याने व्यापारी वर्गाला कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी आढळून आलेल्या पाच कोरोना बाधितांमध्ये दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यातील एक चायनीज व्यावसायिक असून दुसरा मेडिकल व्यावसायिक आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये देऊळवाडा येथे दोन रुग्ण मिळून आले आहेत. याठिकाणी भटजींच्या एका कुटुंबात वडील आणि मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाबा परब यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. श्री. परब यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये मी कोविड टेस्ट केली असता माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतः मुंबई येथून आल्यापासून होम क्वारंटाईन असल्याने माझ्या संपर्कात इतर कुणीही नाही. तरी माझी प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, मालवण.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: