मामा वरेरकर नाट्यगृहाच्या गेटचे टाळे फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

मालवण : शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या परिसरात केले जाणारे बेकायदेशीरपणे पार्किंग रोखण्यासाठी नगरपालिकेमार्फत काही दिवसांपासून मुख्य गेटला रात्रीच्यावेळी ठोकण्यात येणारे टाळे शुक्रवारी रात्री शहरातील काही युवकांनी फोडून गेट उघडून टाकल्याचे दिसून आले आहे. यामुळे पालिका प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार का ? याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. नाट्यगृहाच्या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे.
मालवण नगरपालिकेच्या मालकीच्या मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात होत असलेले बेकायदेशीर पार्किंग
रोखण्यासाठी सर्वच प्रवेशद्वारांचे गेट बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रात्रीच्यावेळी पालिका कर्मचारी सर्व गेट टाळे ठोकून बंद ठेवत आहेत. शुक्रवारी रात्री शहरातील काही युवकांनी आपल्या कार नाट्यगृह परिसरात लावल्या होत्या.
मात्र गेट बंद असल्याने कार बाहेर काढता येत नसल्याने थेट गेटचे टाळेच फोडण्यात आल्याचे सकाळी दिसून आले आहे. नाट्यगृह परिसरात सीसीटिव्ही बसविण्यात आलेले असून हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दुसऱ्या
बाजुच्या छोट्या गेटकडे करण्यात आलेले बांधकामाचीही तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित युवकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पालिका प्रशासनाकडूनही यावर कडक कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधीही पाठपुरावा
करणार असल्याचे समजते.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, मालवण.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: