मातोश्री बाहेर दरोडेखोराला पिस्तुलासह अटक; मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना बाहेर एका दरोडेखोराला पिस्तुलासह अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मातोश्रीपासून १०० मीटर अंतरावर या दरोडेखोराला ताब्यात घेण्यात आलं असून ईर्शाद खान असं आरोपीचं नाव आहे.

त्याच्याकडून एका पिस्तुलासह सात काडतुसं सापडली आहेत. ईर्शाद खान या परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. तसाच सावध पवित्रा दाखवत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. ईर्शाद खान वर दरोडा, विना परवाना शस्त्र वापरल्याची गुन्ह्यांची नोंद आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: