माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा जिल्हावासियांना पुन्हा एकदा मदतीचा हात

लाईफटाईम हॉस्पिटल पडवे येथे अजून ५० बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार; यापूर्वी करण्यात आली आहे ५० बेडची व्यवस्था

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असतानाच दिवसेंदिवस वाढणाऱ्या रूग्णांवर योग्य उपचार व्हावेत आणि कोविड रुग्णांना सुविधा मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यापूर्वीच एसएसपीएम हॉस्पिटल-पडवे येथे कोविड रुग्णांवर उपचाराकरिता ५० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आजही जिल्ह्यात वाढणारी रुग्णसंख्या विचारात घेत राणे यांनी अजून ५० बेड जिल्ह्यातील रुग्णांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हा रुग्णालयासह शासकीय कोविड सेंटर भरलेली असताना नारायण राणे यांनी जिल्हावासीयांसाठी पुन्हा एकदा दातृत्वाचा हात पुढे करत जिल्हावासीयांसाठी पुढाकार घेतला आहे.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: