महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. 1 : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणार्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तथा राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्यामहापौर किशोरी पेडणेकर,मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा ६१ वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.

ब्युरो न्युज कोकण नाऊ मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: