महाराष्ट्र घडवायला निघालोय; संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरेंचे प्रतिपादन

कुडाळ : जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मिळणार लोकांचं प्रेम हीच माझी ताकद आहे. याच ताकदीच्या जोरावर महाराष्ट्र घडवायला निघालोय, असं प्रतिपादन युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कुडाळमध्ये आलेल्या आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळावा झाला, त्यावेळी ठाकरे बोलत होते.  पुढल्या वेळी येईन तो प्रचारासाठी नाही तर विजयी मेळाव्यासाठी येईन असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.    

वेंगुर्ल्याहून सुरु झालेली आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा कुडाळ मध्ये पोहोचली तेव्हा दुपारचा एक वाजून गेला होता. गांधी चौकात जल्लोषी स्वागत स्वीकारून यात्रा महालक्ष्मी हॉल कडे मार्गस्थ झाली. महालक्ष्मी सभागृहात शिवसेनेच्या विजय संकलप मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होत. आदित्य ठाकरे यांच्या सोबत यावेळी उद्योमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, जान्हवी सावंत, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, राजन नाईक, हरी खोबरेकर, मंदार शिरसाट  यासह मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वैभव नाईक यांनी सर्वांचं स्वागत केलं. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा आमदार वैभव नाईक यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला. 


    राज्याला घोषणा करणारे नेतृत्व नकोय तर लोक कल्याणाचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणार नेतृत्व हव आहे आणि ते नेतृत्व देण्याची ताकद आदित्य ठाकरे यांच्यात असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी बाहेर पडलेला युवा नेता काय चमत्कार घडवू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे आदित्य ठाकरे यांची हि जन  आशीर्वाद यात्रा आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणले. आदित्य ठाकरे याना जनतेचा आशीर्वाद आहेच आणि या यात्रेने तो उद्या दुप्पट होईल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. ‘कुडाळ, सावंतवाडी झाँकी है, कणकवली अभी बाकी है’, असं सांगून सिंधुदुर्ग रत्नागिरीत सर्व जागांवर शिवसेनेचा भगवा फडकवेल असा विश्वास सुभाष देसाई यांनी यावेळी युवक केला.    

जन आशीर्वाद  यात्रेच्या निमित्ताने लोकांचं भरभरून प्रेम मिळत असल्याचं सांगून कोकण नक्कीच भगवेमय होईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यायला व्यक्त केला. आता प्रचाराला नाही तर थेट विजयी मेळाव्यातच येईन असं ते म्हणाले. कोकणच्या प्रेमाने भारावून गेल्याचहि त्यानी आवर्जून सांगितलं. 
   यावेळी कुडाळ तालुक्याच्या वतीने भव्य पुष्पहार देऊन आदित्य ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. तसेच दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या थ्री व्हीलरची १४ नियुक्ती पत्र लाभार्थ्यांना देण्यात आली. यावेळी दशावतारी कलाकारांच्या हस्ते आदित्य ठाकरे याना तलवार भेट देण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्र संचालन बबन बोभाटे यांनी केलं. यावेळी संजय भोगटे, राजू जांभेकर, किसन मांजरेकर, दीपेश परब, राजू गवंडे, प्रज्ञा राणे, सचिन कळप, बाळा वेंगुर्लेकर, राजन जाधव, वगैरे मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: