महाराष्ट्रावर पावणेपाच लाख कोटींचा कर्जाचा बोजा

मुंबई : राज्यातील महसुली उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असून ही महसुली तूट २० हजार २९३ कोटींनी वाढली आहे. परिणामी राज्यावर एकूण ४ लाख ७१ हजार ६४२ कोटींचं कर्ज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५७ हजार कोटींची वाढ झाली आहे.

अर्थमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (दि.६ मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी विधानसभेत राज्याची आर्थिक पाहणी अहवाल २०१९-२० मांडला. यात राज्याची महसुली तूट २० हजार २९३ कोटींनी वाढली आहे. तसेच दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.  पहिल्या क्रमांकावर हरियाणा असून तेथील उत्पन्न २,२६,६४४ इतके आहे. त्याखालोखाल कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू ही राज्ये आहेत. महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर येथील उत्पन्न १,९१,७३६ रूपये आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: