मळगाव येथे संविधान दिन साजरा

मा. सुरेश प्रभू, माजी रेल्वे केंद्रीय मंत्री यांच्या मानव सांधन संस्था यांच्याकडुन १० महिलांना शिलाई मशिन वाटप

सावंतवाडी: संविधान दिन निमित्त भारतीय पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा,ता.सावंतवाडी मार्फत मळगाव येथील माता रमाई डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने संविधान पुजन आणि वाचन करण्यात आले. यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव, मळगाव सरपंच स्नेहल जामदार , उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निकीता बुगडे, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच अर्चना जाधव, वसंत जाधव, सावंतवाडी बांदा मंडळ अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन व संविधान वाचन करण्यात आले. त्यानंतर विचार मंच्यावर अध्यक्ष चंद्रकांत जाधव,प्रमुख पाहुणे सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच यांनी आपले विचार मांडले.त्यानंतर चंद्रकांत जाधव यांनी संविधानविषयी मार्गदर्शन विचार संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंसत जाधव यांनी केले. यावेळी बुथ अध्यक्ष कमलाकर राऊळ, रमेश जाधव, रघुनाथ जाधव, पुजा सावळ, दीपाली सिद्धार्थ जाधव,अनिशा जाधव, शोभा अनिल जाधव, स्नेहल जाधव, अश्विनी जाधव, तुळशी जाधव व पदाधिकारी मान्यवर मंडळी व सहकारी महिला भगिनी बांधव यांच्या समवेत संविधान दिन साजरा करण्यात आला. यानंतर मा, सुरेश प्रभू, माजी रेल्वे केंद्रीय मंत्री यांच्या मानव सांधन संस्था यांच्या कडुन दहा महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आले व महिलांचा सन्मान करण्यात आला.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: