मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही ते सांगावं ?

मालवण : न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळून एक महिना तीन दिवस झाले तरी अद्याप राज्य सरकारने न्यायालयात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल का केली नाही ? असा सवाल भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांना फक्त मराठा आरक्षणासाठी भेटलेले नाही, हे मराठा समाजाने लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. त्या पार्श्वभूमीवर माजी खा. निलेश राणे यांनी ट्विटर वरून प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी साहेबांना फक्त मराठा आरक्षणासाठी भेटलेले नाही. त्या भेटीमागे ७ ते ८ विषय होते त्यातला एक विषय मराठा आरक्षणाचा होता. एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही ?? सांगावं.” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ,मालवण

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: