मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे झाला बाबा !

मुंबई : मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बाबा झाला आहे. संकर्षणच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. २७ जून रोजी या दोन्ही बाळांचा जन्म झाला आहे. संकर्षणने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. महत्वाचं म्हणजे या दोघांची नावं देखील त्याने शेअर केली आहे. 
दोन चिमुकल्यांसोबतचे संकर्षणने फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.या फोटो मध्ये लहान बाळांचा चेहरा दिसत नाही पण त्यांची नाव अतिशय गोड आहेत. 
संकर्षणने मुलाचं नाव ‘सर्वज्ञ’ आणि ‘स्रग्वी’ असं मुलीचं नाव ठेवलं आहे. या दोन्ही नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेक कलाकारांनी संकर्षणला बाबा झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: