भ्रष्टाचारी, खंडणीखोरांनी भान ठेवून बोलावे

कणकवली उपसभापती प्रकाश पारकर यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
“त्या”मुळेच कन्हैया पारकर यांच्यावर आली घरी बसण्याची वेळ

कणकवली : प.स.कणकवलीचे नवीन इमारतीचे काम हे आता पर्यंत पूर्णपणे योग्य रीतीने व यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे.यामध्ये कोणताही भ्रष्टाचार किंवा चुकीचे काम झालेले नाही. सदरचे काम व्यवस्थितपणे पूर्ण करून लवकरात लवकर पं.स कणकवलीची अद्ययावत प्रशासकीय इमारत लोकांच्या सेवेत रुजू व्हावी लोकांना एकाच ठिकाणी सर्व विभागांची कामे कमी वेळेत करता यावी जनतेला कोणताही त्रास होऊ नये या हेतुनेच सदरची कामे लवकरात लवकर पूर्ण केलेली आहेत. केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतीमध्ये अपशकुनी बोके चांगल्या कामामध्ये आडवे येण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी त्यांनी प्रत्यक्ष कामासंदर्भातील माहिती घ्यावी कणकवली पंचायत समितीने राबविले गेली कित्येक वर्षे उपक्रम व केलेली विकास कामाची कणकवलीतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रने दखल घेतली. तेव्हा आपण कुठे झोप काढत होता याचा खुलासा करावा. यांच्या अनेक वर्षांच्या कालावधी मध्ये टक्केवारीचे राजकारण करून पोट भरणाऱ्या अशा निष्क्रिय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगले काम करणाऱ्या लोक प्रतिनिधिची स्तुती करता येत नसेल तर किमान चांगल्या कामात मांजर आडवी त्याप्रमाणे गालबोट लावण्याचे काम करू नये .असा टोला कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांनी लगावला. 2014 साली न.प कणकवली मध्ये कन्हैया पारकर उपनगराध्यक्ष असताना पाण्याच्या नळाचे 900 रुपयांचे मीटर 2143 रुपयाला खरेदी करून कणकवली न.प मध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. हे सर्वांना ज्ञात आहे.म्हणूनच तेव्हा त्यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते. कन्हैया पारकर यांच्या अश्याच वृत्ती मुळे त्यांचे भाऊ संदेश पारकर यांना घरी बसावे लागले.आता हेच काम कन्हैया पारकर शिवसेनेच्या शाखेत बसून वैभव नाईक यांना घरी बसवण्याचा प्रयत्न करत नाही ना ? असे वाटते. कन्हैया पारकर हे मागच्या दाराने कणकवली न.प मध्ये नगरसेवक आहेत,ते देखील भाजप मुळेच आहेत हे त्यांनी विसरू नये. शैलेश भोगले यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. अशा खंडणीखोर शैलेश भोगले यांनी सभापती यांच्या बद्दल बोलताना भान ठेवून व विचार करून बोलावे . स्वतःची गेलेली वकिली(सनद) ही हर्षद गावडे यांनी घालवून आता शिवसेनेत टक्केवारीचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे त्यांना कोणतेच चांगले काम दिसत नाही.प.स कणकवली चे पदाधिकारी आपला प्रशासकीय कारभार अत्यंत स्वच्छ व निस्वार्थ पणाने करत आहेत.याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या कार्यकत्यांना बरेच वेळा आलेला आहे. त्यामुळे कणकवली प.स चा कारभार सुरळीत पाडण्यासाठी सभापती व सदस्य सक्षम आहेत. असे पारकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: