भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण याला कोरोनाची लागण झाली आहे. इरफानने सोमवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ‘कोणतीही लक्षणे नसताना माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला घरीच आयसोलेट केले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्यांनी चाचणी करावी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. स्वत:ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा’, असे इरफानने म्हटले आहे.
दरम्यान, इरफानच्या अगोदर एस. बद्रीनाथ, सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्व खेळाडू छत्तीसगडच्या रायपूरमध्ये पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, असा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, नवी दिल्ली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: