भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

कोविड इंजेक्शनच्या केलेल्या दुजाभावासाठी करणार केंद्र सरकारचा निषेध; कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीचा सावंतवाडी जिल्हा कार्यालयाजवळ कार्यक्रमाचे आयोजन- जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे

सावंतवाडी : उद्या, १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने सावंतवाडी येथील जिल्हा कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात जे कोरोनाग्रस्त झालेत त्या रुग्णांसाठी रक्त गरजेचे असल्याने जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त कोविड ग्रस्तांसाठी ही हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. जे कोविडग्रस्त आहेत त्यांना काँग्रेसकडून मदत मिळणार आहे.
केंद्रातील भाजप सरकारने कोविड इंजेक्शन देण्यासाठी जो दुजेभाव केला आणि महाराष्ट्रातील जनतेला जो त्रास दिला; त्यामुळे उद्या जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करणयात येणार आहे ,असे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: