भाजप सरकारच्या चुका दुरुस्त कराव्या लागतील – शरद पवार

कोल्हापूर :  एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी एसटी कामगारांना दोन-तीन महिने वेतन मिळत नाही; याला राज्यकर्ते जबाबदार आहेत. गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारकडून अनेक चुका झाल्या आहेत. त्या महाविकास आघाडीला दुरुस्त कराव्या लागतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५६ वे राज्यव्यापी वार्षिक अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे पार पाडले. या अधिवेशनाचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप सरकारकडून ज्या चुका झाल्या आहेत. त्या मान्यताप्राप्त संघटनेला विश्वासात घेऊन आपल्याला सोडवायच्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील एसटीचा संचित तोटा पाच हजार कोटींचा आहे. यात बदल करायला पाहिजे. एसटीचा दर्जा सुधारुन प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा दिल्यास येत्या तीन वर्षांत हे चित्र नक्कीच बदलेल असा विश्वास ही पवार यांनी व्यक्त केला.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कोल्हापूर.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: