भाजप महिला मोर्चाच्या वतीने सांर्गिडेवाडी येथे कन्यापूजन कार्यक्रम संपन्न

कुडाळ :- सांगिर्डेवाडी कुडाळ येथे श्री. परब यांच्या निवासस्थानी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या प्रसाद तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि आमच्या मार्गदर्शक उषा आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापूजन कार्यक्रमाचे महिला मोर्चा उपाध्यक्ष मुक्ती परब यांनी आयोजन केले. यावेळी उपस्थित बालिकांचे पूजन करुन त्यांना भेटवस्तू तसेच खाऊ देण्यात आला.


या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर,जिल्हा कार्यकारीणी सदस्य साक्षी सावंत,तालुका चिटणीस रेवती राणे,शहर अध्यक्षा ममता धुरी , शहर सरचिटणीस अक्षता कुडाळकर, ममता कुंभार,उपाध्यक्ष मुक्ती परब,तेजस्विनी वैद्य,चिटणीस,विशाखा कुलकर्णी, प्राची आठल्ये, राणे,परब तसेच स्थानिक महिला आणि खास निमंत्रित सांगिर्डेवाडीतील बालिका उपस्थित होत्या .

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: