भजनातून जमलेल्या निधीतून केली गरजू वृद्धेला आर्थिक मदत

तारकर्ली गावातील बाळगोपाळांचा सलग तिसऱ्या वर्षी कौतुकास्पद उपक्रम

मालवण : एकीकडे कोरानाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चांना सगळीकडे उधाण आलं असताना तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी मात्र समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला. तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, यज्ञेश वंदन केरकर, कु. वेदांत सदाशिव सागवेकर, ईशान सदाशीव सागवेकर, प्रणित भार्गव कांदळगावकर, निनाद गणपत मोंडकर, रिषभ श्रीधर खराडे, हार्दिक सतिश टिकम, सिद्धेश नरेश टिकम, नैतिक धोंडी कांदळगावकर,‌ रोहित बाळकृष्ण वरक आणि देवेश पराडकर या बाळगोपाळांनी गणेशोत्सवादरम्यान आपल्या बालभजन मंडळामार्फत गणेश भजन करून त्यातून गोळा झालेल्या निधीमधील काही भाग तारकर्ली गावातील मीना महादेव बटा या गरजू महिलेस मदत म्हणून दिला. त्यामुळे कोरोना काळात या महिलेचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे. यापूर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी रवि टिकम या आजारी तरूणाला आर्थिक मदत तसेच गावातील निराधार आणी गरजू महिलांना आर्थिक मदत केली होती. यासाठी‌ त्यांना कामानिमित्त सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या प्रदिप तोंडवळकर यांनी ५,००० रुपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षिस पाठवले होते. हे बाळगोपाळ आपल्या नकळत्या वयात सुद्धा अशाप्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मालवण

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: