बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

आचरा : मालवण तहसीलदार अजय पाटणे  याच्या आदेशानुसार बुधवारी सायंकाळी  आचरा मालवण रस्त्यावरुनच अनधिकृत वाळू वाहतूक  करताना आढळून आलेल्या डंपरवर महसूल कडून कारवाई करण्यात आली आहे.  यात  डंपर क्रम GA 04 T 3361 या मध्ये 2 ब्रास वाळू मिळून आली असल्याने सदर गाडी दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय मालवण येथे जमा करण्यात आला असल्याची माहिती वायंगणी तलाठी कंठाळे यांनी दिली आहे.  सदर कारवाई आचरा मंडळ अधिकारी पाटील याच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सोबत तलाठी वायंगणी व्ही व्ही कंठाळे व तलाठी कोळंब श्री .कांबळे हे सहभागी झाले होते.

​​अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: