बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना शुभेच्छा

   कुडाळ​: सिंधुदुर्गातील विविध सामाजिक, राजकीय आव्हाने पेलण्यासाठी बळ देण्याच्या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, त्यांचे सहकारी डॉक्टर व्यंकटेश भंडारी, पल्लवी कामत, पियुषा प्रभू तेंडुलकर यांच्या सहित डॉ.राजेंद्र दाभाडे यांनी डि.एस.पी. कार्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या .
   सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. विविध राजकीय पक्षांमध्ये येथील मतदार विभागला गेलेला आहे. तरीसुद्धा राजकीय सामाजिक सलोखा सहसा बिघडविला जात नाही. सामाजिक व देशप्रेमी घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील व सहकार्यशील  जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची ओळख आहे. आदरातिथ्यशीलता  हा या जिल्ह्याचा विशेष आहे.
    या पार्श्वभूमीवर मात्र इतर राज्यांच्या सीमा, काही गुन्हेगारी अनिष्ट प्रवृत्तींचा सामना करत असताना पोलीस खात्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. मात्र आज पर्यंत अनेक सक्षम जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभल्यामुळे त्यांनी या सर्वांवर मात करून सिंधुदुर्ग जिल्हयाची प्रतिमा मलीन होऊ दिली नाही. असेच कार्य करण्यासाठी  सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या  व्यक्तींच्या शुभेच्छांचं पाठबळ असणे गरजेचे आहे; हे लक्षात घेऊन पोलीस विभागाला सतत सहकार्य करणारे बॅरिस्टर नाथ पै  शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर अग्रणी असतात. हे त्यांनी या  सदिच्छा भेटीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अर्थात या सदिच्छा भेटीबाबत डॉ.दाभाडे यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.​​

निलेश जोशी , कोकण नाऊ, कुडाळ 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: