बुडून मृत्यू पावलेल्या कर्मचारी कुटुंबांच्या कामगार संघटनेचा उद्या मोर्चा

ओएनजीसी, कंत्राटदार कंपनीच्या कार्यालयावर धडकणार मोर्चा

मुंबई : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून मुंबई हायजवळ P305 बार्ज आणि वरप्रदा बुडून ८६ कर्मचारी प्राणास मुकले. याला ओएनजीसी आणि अफकॉन्स कंपनी जबाबदार असून कर्मचाऱ्यांना सर्व भरपाई मिळावी म्हणून उद्या वांद्रे येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने आज मुंबई प्रेस् क्लब शेजारील युनियन कार्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळेस सीआयटीयु आणि एफएसयुआय युनियनचे जेष्ठ नेते डॉ. विवेक मोन्तेरो, कॉ. मनोज यादव, कॉ. के. नारायणन उपस्थित होते.


यावेळी डॉ. मोन्तेरो म्हणाले की, नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून मुंबई हायजवळ P305 बार्ज आणि वरप्रदा बुडून ८६ कर्मचारी प्राणास मुकले असून त्यांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. याला संपूर्ण जबाबदार ओएनजीसी आणि अफकॉन्स कंपनी आहे. कंपनीच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असून कर्मचारी, कामगार यांच्या कुटुंबाला नियमाने भरपाई दिलेली. त्यामुळे ओएनजीसी आणि अफकॉन्स कंपनीविरोधात सीआयटीयु आणि एफएसयुआय युनियनच्या वतीने मोर्चा काढणार असल्याची माहिती कॉ. मोन्तेरो, कॉ. यादव यांनी दिली. युनियनच्या वतीने उद्या ओएनजीसी मुख्य कार्यालय, वसुंधरा बिल्डिंग, वांद्रे येथे दुपारी ३:३० वाजता निदर्शने करण्यात येतील. या आंदोलनचे नेतृत्व, राष्ट्रीय कामगार नेते डॉ. डी. एल. कराड करणार आहेत. तसेच सीआयटीयु, महाराष्ट्र, मुंबई कमिटीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि मृत्यू पावलेल्या कुटुंबातील वक्ती सहभागी होणार आहेत, असे कॉ. नारायणन यांनी जाहीर केले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: