बीएसएनएलचे पिलर बॉक्स चोरीला

कणकवली : भारत दूरसंचार निगमच्या जानवली शिक्षक कॉलनी येथील ४५ हजार रुपयांचे पिलर बॉक्स चोरीस गेले आहेत. याप्रकरणी महामार्गाचे ठेकेदार कंपनी केसीसी कन्स्ट्रक्शन विरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भारत दूरसंचार विभागाने फिर्याद दाखल केली आहे. जानवली शिक्षक कॉलनी येथे बीएसएनएलचा पिलर बॉक्स होता. हा बॉक्स राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बीएसएनएलला कोणतीही कल्पना न देता अन्य ठिकाणी हलविला आहे. या पिलर बॉक्सची किंमत ४५ हजार रुपये असून या बॉक्समधून शिक्षक कॉलनीतील ग्राहकांना टेलीफोनसेवा पुरविण्यात आली ओट.हा बॉक्स बीएसएनएलला कोणतीही कल्पना न देता काढल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्या परिसरातील ग्राहकांना सेवा देता येत नाही. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत केसीसी कन्स्ट्रक्शनवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: