बंडवाडी मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आवळेश्वर तांबळवाडी संघाची बाजी

खारेपाटण : बंडवाडी मित्रमंडळ कासार्डे आयोजित भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आवळेश्वर तांबळवाडी संघाने अंतिम सामन्यात साई स्पोर्ट्स हुंबरठ संघावर मात करीत प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक ५०२१ रुपये व आकर्षक चषक पटकावला.​ ​सदर स्पर्धेत दोन दिवसात २४ संघ सहभागी झाले होते.
बंडवाडीच्या मैदानावर बंडवाडी मित्रमंडळाने स्पर्धेचे आयोजन केले होते.​ ​या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे विजेते साई स्पोर्ट्स हुंबरठ संघास ३०२१ रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते कासार्डे बौद्धवाडी व चतुर्थ क्रमांकाचे विजेते विठ्ठला मायबापा संघास आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या​ हस्ते​ गौरविण्यात आले.​ ​तसेच वैयक्तिक पारितोषिकामध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून हरीश जाधव,​ ​क्षेत्ररक्षक प्रगणेश गुरव,​ ​उत्कृष्ट गोलंदाज आवळेश्वर तांबळवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू ओमकार पाटील तर सामनावीर व मालिकावीराचा बहुमान आवळेश्वर तांबळवाडी संघाचा बाळकृष्ण कदम याने पटकावला.​ ​या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
        या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला उद्योजक ​​श्रावणशेठ बांदिवडेकर, श्रीपतभाई पाताडे,​ ​पपी पाताडे,​ ​दयानंद पाताडे,​ ​साक्षी सुर्वे,​ ​नंदू गोसावी, किशोर आडिवरेकर,​ ​प्रभु कांबळे, किरण चव्हाण, रवी चव्हाण, मनोहर नकाशे,​ ​विद्याधर नकाशे,​ ​उद्धव महाडीक,​ ​नाना बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
       समालोचक म्हणून राजा सामंत व लक्ष्मण आडिवरेकर यांनी भूमिका पार पाडली. तसेच या सामन्यादरम्यान सोनी नकाशे,​ ​सुहास नकाशे,​ ​संदेश सुतार,​ ​गणेश चव्हाण, गणेश कोलते यांनी कामगिरी पार पाडली. ​ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बंडवाडी मित्रमंडळ कासार्डेचे सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ​,​ खारेपाटण​​.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: