फोंडाघाट बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

​कणकवली :​ ​फोंडाघाट बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उभारला आहे​.​ काल दिवसभ​रात सुमारे २८००/- रु  दंड वसूल करण्यात आला आहे​​. गेले काही महिने शासन, ग्रामपंचायत, व्यापारी संघ, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, विविध पातळ्यांवर covid-19 बाबत जनजागृती करत असताना देखील फोंडाघाट बाजारपेठत​ ​मात्र मासे मार्केट, भाजी विक्रेते​ ​इत्यादी ठिकाणी मास्क, सुरक्षीत अंतर, गर्दि टाळणे,​ ​सॅनिटायझर इत्यादींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे नेहमी दिसत होते. प्रसंगी वादाच्या घटनाही घडल्या. उठाबशा काढायलाही लावल्या. परंतु जनसामान्यांनी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत​. ​
गेल्या दोन दिवसात आणि सुमारे २१/२२ दिवसांच्या खंडानंतर फोंडाघाट ​७-८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.अन् प्रशासन खडबडून जागे झाले. शिथिलता आल्याने बंदोबस्त, अतिवृष्टीचे पंचनामे इत्यादी प्रशासकीय कामकाजात मग्न असलेली ग्राम- दक्षता समिती सक्रिय झाली.आणि मास्क-विना घराबाहेर पडणाऱ्यावर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली.यामध्ये पो. हेडकॉन्स्टेबल एम्.बी.देऊलकर,पो. कॉन्स्टेबल एस्.व्ही.सोंसुरकर, ग्रा.पं लेखनीक जोईल सहभागी झाले. त्यांनी सुमारे २८००/- रुपये दंड  जमा केला. या मोहिमेला सरपंच संतोष आग्रे, ग्रामविस्तार अधिकारी चौलकर यांनी सहकार्य केले. या मोहिमेमुळे विना-मास्क फिरणार्‍यांची तारांबळ उडाली. मात्र कारवाई पथक एस.टी. स्टँड समोर आणि गांधी चौकात एकाच वेळी कार्यरत रहावे आणि वाहनचालक प्रवासी तसेच दुकानांमध्ये सुरक्षित अंतर न राखणाऱ्यावरही दंडात्मक कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

उमेश बुचडे​,​ कोकण नाऊ​,​ कणकवली​​. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: