प्रवीण दळवी यांनी दिल्या घरी सुखी रहावे

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस एम एम सावंत यांचा टोला

कणकवली : राष्ट्रीय काँग्रेस चे कळसुली विभागीय अध्यक्ष प्रवीण दळवी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला हे माध्यमातून समजले. वास्तविक प्रवीण दळवी हे तीन वर्षापूर्वी अध्यक्ष होते. आता ते माजी होते. नवीन कमिटीत त्यांचे व इतर बूथ अध्यक्षाचे नाव ही नाही. त्यामुळे काँग्रेसला धक्का लागायचे राहिले दूरच. जरा सुद्धा कंप जाणवला नाही. त्यामुळे प्रवीण दळवी वगैरे यांना दिल्या घरी सुखी रहा असा सल्ला कणकवली तालुका काँग्रेस कमिटी देत असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस एम एम सावंत यांनी दिली आहे. तसेच भाजप तालुका अध्यक्ष यांची अवस्था”बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना,,”अशी झाली आहे. ती तशीच रहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना आल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: