प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेमार्फत ११ वी विज्ञान शाखेतील OBC / VJNT / SBC विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब

वेंगुर्ले तालुक्यातील खर्डेकर महाविद्यालय , शिरोडा येथील गोगटे ज्यु.काॅलेज व वेतोरे येथील गुलाबताई नाईक कनिष्ठ महाविद्यालयात कॅम्पचे आयोजन

वेंगुर्ला: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी विविध योजना आणल्या . ” अंतोद्यय ” ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजाचा शेवटचा घटक हा सक्षम करण्यासाठी लोकाभीमुख योजना तयार केल्या . तसेच या योजना तळागाळापर्यंत पोहोचवीण्याकरीता प्रधानमंत्री जनकल्याणकारी जागरुकता अभियानाची निर्मिती केली . या अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनित कुमार कौशिद यांच्या नेतृत्वाखाली देशभरात हे अभियान राबविण्यात येत आहे .महाराष्ट्रात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेत पोहचवीण्याचे काम या अभियानाच्या वतीने केले जाते अशी माहिती प्रदेश सचिव नारायण सावंत यांनी दिली .
MH – CET / JEE / NEET या परीक्षेच्या २०२३ करीता ऑनलाईन पूर्वतयारी साठी मोदी सरकारने ही योजना आणली आहे . OBC / VJNT / SBC या प्रवर्गातील नाॅनक्रीमीलीयर उत्पंन्न गटातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे .ही योजना ३० नोव्हेंबर २१ पर्यंत चालू आहे . सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील गुलाबताई दि.नाईक कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी , बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय – वेंगुर्ले येथे सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी , शिरोडा येथील गोगटे ज्यु काॅलेज येथे मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे . तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे .

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, वेंगुर्ला

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: