प्रत्येक शाळेत घेणार संविधान संवाद शाळा

लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राच्या वतीने हुंबरठ येथे आयोजन

कणकवली : लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र मुख्यालय राधानगरी, यांच्या वतीने संविधान स्विकृती दिनानिमित्त जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा हुंबरठ येथे संविधान संवाद शाळा घेण्यात आली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता मुसळे तसेच इतर शिक्षिका सावंत, नारकर, राणे ह्या उपस्थित होत्या. तसेच ४०,विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता. संविधान संवादक सुजय, स्वप्नाली, सत्यवान जाधव ह्यांनी विद्यार्थ्याकडून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून घेतले. तसेच संविधान म्हणजे काय?, संविधान का? ,कशासाठी? ,संविधान नसते तर? ,तसेच संविधानातील मूल्य , हक्क, कर्तव्य आणि संविधान प्रास्ताविका ह्या विषयावर मांडणी केली. ह्या प्रसंगी केंद्राच्या वतीने सहकारी म्हणून क्रांती जाधव, पियुषा जाधव यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक यांनी ह्या उपक्रमाचे खूप कौतुक केले. तसेच सुजय, स्वप्नाली, सत्यवान ह्यांनी केंद्राच्या वतीने “संविधान ग्रेट भेट ” हे पुस्तक शाळेला सदिच्छा म्हणून दिल. तसेच सुजय जाधव ह्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शाळा काॅलेज मध्ये संविधान संवादशाळा घेण्याची ईच्छा व्यक्त केली. आणि तस नियोजन पण आहे. 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी पर्यंत ह्या केंद्रातिल सर्व संवादक संविधान संवाद शाळा घेणार आहेत.
आजच्या कार्यशाळेसाठीसंविधान संवादक सुनिल स्वामी, रेश्मा खाडे, हर्षल जाधव, तुषार चोपडे, प्रमोद गायधनी,
शर्मिला जोशी, अमोल कदम, मिनाक्षी खतगावकर, रूपेश वानखेडे, निलेश साबळे आणि आम्ही संविधान संवादक टिमचे मार्गदर्शन लाभले.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ ,कणकवली.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: