प्रत्येक शहरामध्ये ग्राहक सेवा केंद्र उभारण्याचा मानस

स्टेट बँक शाखाधिकारी प्रकाश चौधरी यांची माहिती

कणकवलीत स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ

कणकवली : शहरात स्टेट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना कमीतकमी वेळात उत्तम सेवा मिळावी. यासाठी ग्राहक सेवा केंद्राची दुसरी शाखा कणकवलीत सुरु करण्यात आली आहे. स्टेट बँकेत रोजची होणारी ग्राहकांची गर्दी आणि अल्प प्रमाणात असणारा स्टाफ यामुळे ग्राहकांना त्रास होत होता. स्टेट बँकेच्या माध्यमातून कस्टमर सर्व्हिस पॉईंट उघडण्यात आला असून प्रत्येक शहरामध्ये असे केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे स्टेट बँक शाखा अधिकारी प्रकाश चौधरी यांनी सांगितले.              
स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ स्टेट बँक शाखा अधिकारी प्रकाश चौधरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी बँकेचे रवींद्र परब, व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर, उमेश वाळके, माधव शिरसाट, प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते. परब म्हणाले, कणकवली स्टेट बँक शाखेतून जी सेवा ग्राहकांना दिली जाते तीच सेवा या केंद्रातून विनामूल्य मिळणार आहे. मात्र, तो कणकवली शाखेचा ग्राहक पाहिजे. अन्यथा काही शुल्क भरून इतर शाखेतील ग्राहकांना सेवा दिली जाईल. रोजच्या गर्दीमुळे ग्राहक या बँकेपासून दूर जात होता. आता व्यापारी वर्गालाही रोजच्या कामासाठी हे सेवा केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे सांगत या केंद्रातून फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.       या ग्राहक सेवा केंद्राची माहिती देताना राजाध्यक्ष म्हणाले, कणकवली स्टेट बँकशेजारी हे सेवा केंद्र असून ग्राहकांना दर्जेदार सेवा देणार असून यामधून मनी ट्रान्सफर, एटीएम काढणे, आधार कार्डव्दारे पैसे काढणे, जन-धन खाते ओपनिंग, कर्ज हाप्ते भरणा अशा आदी सुवीधा वर्षभर सुट्टीत ही मिळणार आहेत. या सेवेमुळे ग्राहकांना होणार त्रास टळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: