पुरग्रस्तांना कुडाळ मनसेच्या वतीने मदत; मदतीचा टेम्पो रवाना

कुडाळ : कोल्हापूर सांगली भागात उदभवलेल्या प्रलयकारी परिस्थिमुळे तिथले जनजीवन कमालीचं विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्तांना विविध संस्था मदतीचा हात देत आहेत. कुडाळ तालुका मनसेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच औचित्य साधून या पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. मदतीचा टेम्पो १५ ऑगस्टला या भागात रवाना झाला.    

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने  झालेल्या महापुराच्या स्थितीत अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. कोल्हापूर सांगली जिल्हयाला पावसाने अक्षरशः झोडपून काढल्यामुळे पूर आला या पुरामध्ये लाखो नागरिक व त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. जीव वाचावा यासाठी कष्टाने बांधलेली घर आणि संसार तसेच पाण्यात सोडून ते बाहेर पडले. कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या पूरग्रस्तासाठी मदत कार्य सुरु झालं आहे. अशा स्थितीत सरकार मदत आणि बचाव कार्य करतच आहे. सोबत अनेक स्वयंसेवी संस्थां देखील या पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे आल्या आहेत. या पूरग्रस्तांना आपलीही काही मदत व्हावी, यासाठी सिंधुदुर्गातूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. यासाठी  १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिना दिवशी एका टेम्पो मधून महिलांसाठी साड्या, लहानमुलांसाठी कपडे, पाण्याच्या २५०० बाटल्या, तसेच सॅनिटरी नॅपकिन अशा जीवनावश्यक वस्तु  पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आल्या. यावेळी बनी नाडकर्णी, धीरज परब, प्रसाद गावडे तालुकाध्यक्ष, राजेश टंगंसाळी, बाळा पावसकर, रामा सावंत , चेतन राउळ, दीपक गावडे, सुप्रिया मेहता आदी उपस्थित होते. 


प्रियांका लोके, कोकण नाऊ,  कुडाळ.  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: