पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा रुग्णालयास भेट

सिंधुदुर्गनगरी : राज्‍याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयास अचानक भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री यांनी बाह्य रुग्ण विभागीची सेवा कशा पद्धतीने सुरू आहे याचीही माहिती घेतली. तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी करावयाच्या कार्यवाही विषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांना सूचना दिल्या. ओपीडीमध्ये डॉक्टर्स येण्याची वेळ निश्चित करण्याचे सांगून पालकमंती श्री. सामंत म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये अमुलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रस्ताव सादर करावेत. तसेच रुग्णांना अधुनिक सोयी सुविधा पुरवाव्यात, अधुनिक यंत्र सामग्री खरेदी करावी, जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेमध्ये त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांच्यासोबत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळचे आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: