पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे शिरगाव प्राथ.आरोग्य केंद्राला मिळाली ऍब्युलन्स

देवगड – गेली अनेक वर्षे शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहीका नसल्यामुळे शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत होती. वेळोवेळी मागणी करुन सुध्दा यापुर्वीच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने या विषयासाठी पाठपुरावा केला नव्हता. गेली अनेक वर्षे या मतदारसंघातुन अनेक लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याची महत्त्वाची पदे उपभोगली परंतु जी जुनी रुग्णवाहीका होती तिच्या साध्या दुरुस्तीसाठी सुध्दा निधी आणु शकले नाहीत. म्हणुनच आपण या मतदारसंघाचा लोकप्रनिधी म्हणून प्रथम प्राधान्याने या आरोग्यकेंद्राला सुसज्ज रुग्णवाहीका मिळावी म्हणुन गेली दोन वर्ष सतत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. परंतु निधी अभावी हे काम रखडले होते ते या कोवीड १९ च्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतुन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनुसार देवगड तालुक्यातील शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हि सुसज्ज रुग्णवाहीका देण्यात आली, अशी माहिती तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी दिली.

२९ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले. शिरगाव सारख्या ग्रामीण भागाला सुसज्ज रुग्णवाहीका देऊन येथील ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय दूर केल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांचे या मतदारसंघातील तालुका प्रमुख देवगड मिलींद साटम, विलास साळसकर, विभाग प्रमुख विरेंद्र तावडे,माजी सभापती रवींद्र जोगल, माजी उपसभापती अमित साळगावकर यांच्या पाठपुराव्याला यश यश मिळाले असून सर्व शिवसैनिक सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या वतीने मी जाहीर आभार व्यक्त करीत आहे, अशी माहिती मिलिंद साटम यांनी दिली

साईनाथ गावकर देवगड

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: