पगार लवकर मिळण्यासाठी एसटी कर्मचारी काँग्रेसच्यावतीने महादेवाला साकडे

मुंबई: मागील १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्याच्या पगाराबाबत अनिश्चितता होती. ७ जून रोजी मिळणारा पगार महिना अखेर आला तरीही झाला नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. कर्मचाऱ्यांच्या थकित पगार त्वरित मिळावा यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारला पत्रव्यवहारही करण्यात आला होता. संघटनेसह सर्व संबंधितानी केलेल्या प्रयत्नामुळे शासनाने ६०० कोटी रुपये निधी मंजूरही केला. पण तरीही तो एसटीकडे वर्ग न झाल्याने आजपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही.
त्यामुळे आज महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने कर्मचाऱ्यांनी मुंबई सेंट्रल येथे कोरोना प्रादुर्भाव संबंधित सर्व नियमांचे पालन करून महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करीत “शासनाला सुबुद्धी मिळो आणि पगार लवकरात लवकर होऊ दे, असे सकाळी साकड़े घातले. तसेच प्रतिकात्मक संदेश देण्यात आला. अचानक शासनाकडून ३०० कोटी एसटीकडे वर्ग करण्याचे आदेश प्राप्त झाले. खरे तर हा निधी शासनाकडून मिळणारच होता. पण तो आजपर्यंत एसटीकडे वर्ग झाला नाही. पण हा निधी प्राप्त झाल्याने निदान या महिन्याच्या पगाराचा प्रश्न तरी निकालात निघाला. महादेवाला घातलेला अभिषेक हा प्रतिकात्मक होता. यातून शासन आणि एसटी प्रशासन याना संदेश पोहोचविण्याचा उद्देश होता. शासन आणि एसटी प्रशासनाला धन्यवाद देऊन या प्रतिकात्मक कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे, कार्याध्यक्ष डी. ए. लिपणे, कोषाध्यक्ष संतोष गायकवाड, फैयाज पठाण, मनीषा कालेश्वर, कविता लांजेवार, मिलिंद हिवसे, महेश मिश्रा, संदीप कातकर, अनिल तरडे आदी पदाधिकारी हजर होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: