पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियान १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत गॅस जोडणी कागदपत्र कॅम्पचे आयोजन

मालवण : जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मालवण तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियान दिनांक १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ त्या कालावधीत गॅस जोडणी कागदपत्र कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पोईप मंडळ अधिकारी कार्यालय येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण मालवण पुरवठा निरीक्षक अधिकारी संतोष खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले  
     पोईप मंडळ अधिकारी कार्यक्षेत्र गावामध्ये केरोसीन लाभ घेणारे तसेच केरोसीन व गॅस लाभ  न न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना या योजनेच्या निकषानुसार १००% गॅस जोडणी लवकरच देण्यात येणार असून याबाबतचे सर्व कागदपत्रे संबंधित लाभार्थ्यानी पोईप मंडळ अधिकारी कार्यालय तसेच राठीवडे धान्य दुकानदार विलास धुरी पोईप धान्य दुकानदार विश्वनाथ पालव मसदे, विलास पांजरी हेदुळ खोटले धान्य दुकानदार विजय भाटकर यांच्याकडे परिपूर्ण प्रस्तावासहित त्वरित दयावीत असे आवाहन मालवण पुरवठा निरीक्षक अधिकारी संतोष खरात यांनी केले आहे १००% गँस जोडणी करून संपूर्ण मालवण तालुका केरोसीन मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती संतोष खरात यांनी दिली यावेळी पोईप मंडळ अधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये ५७ लाभार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारून प्राथमिक स्वरूपात दोन लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले
     यावेळी होईल पोईप मंडळ अधिकारी आर व्ही शिंगाडे पोईप तलाठी एस बी परब, विश्वनाथ पालव, विजय पाटकर, विलास पांढरे, विलास धुरी, मनस्वी इनडीयनचे गँस वितरक शिवरामपंत पालव, सुशील पालव, संतोष नाईक व लाभार्थी उपस्थित होते. 

संतोष हिवाळेकर, कोकण नाऊ, मालवण. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: