नैमित्तिक करारासाठी जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना कोविड च्या सुविधा मिळत नाहीत

कणकवली : ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी विभागाने ठाणे परिवहन विभागाशी केलेल्या नैमित्तिक करारासाठी पाठविण्यात येणाऱ्या एसटीचे चालक व वाहकांना आजही कोणत्या सुविधा मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. या एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची भेट घेत समस्या कथन केल्या. तेली यांना दिलेल्या पत्रात विभाग नियंत्रक यांनी या एसटी कर्मचाऱ्यांना covid-19 च्या अनुषंगाने आवश्यक ते सॅनिटायझर, मास्क पुरवण्यात येत असल्याचे म्हटले होते. मात्र अशा कोणत्याच सुविधा मिळत नसल्याची बाब या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केली. सुमारे ​८० चालक-वाहक हे  आज मुंबई येथे जाणार असून या कर्मचाऱ्यांना covid-19 तिच्या दृष्टीने कोणत्याही ही सुविधा दिल्या नसल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझर मास्क ही आम्ही स्वतःहून खरेदी केली असेही यावेळी स्पष्ट केले. दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना  मधुमेह असे आजार आहेत त्यांनाही ड्युटी साठी जबरदस्ती केली जात असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या एसटी कर्मचाऱ्यांनी आज तेली यांची भेट घेत विभाग नियंत्रकांनी दिलेल्या पत्रातील मुद्द्यांचा पोलखोल केला. यापूर्वी ​१५ दिवसासाठी नैमित्तिक करारासाठी ड्युटी दिली जात होती. मात्र आता ड्युटी सात दिवसांची करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक यांनी तोंडी सांगितल्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच मुंबईवरून परत आल्यानंतरही कोरोना टेस्टसाठी सुविधा उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. मुंबईमध्ये गेल्यानंतर तेथे राहण्यासाठी घाटकोपर येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्या खोल्यांमध्ये पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहत राहू शकत नाही. त्या खोल्याना खिडक्या नाहीत. त्यामुळे गुदमरून मरण्याची वेळ असल्याचेही ही या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच राहण्याच्या ठिकाणावरून ड्युटी साठी पहाटेच्यावेळी येणेही शक्य होत नाही असे त्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच विभाग नियंत्रक सांगत असलेल्या एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ होत असल्याचाही मुद्दा या कर्मचाऱ्यांनी खोडला असून अद्याप अशी वाढ होत नसल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच पासची सुविधाही सुरू करण्यात आली नसल्याचा मुद्दा कर्मचाऱ्यांनी या भेटीदरम्यान स्पष्ट केला.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, ​कणकवली​​. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: