नेमळे येथे संवाद यात्रा संपन्न

सावंतवाडी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा भूमी संवर्धन समितीने समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन समतेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी आयोजित केलेला संवाद यात्रेचा दुसरा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी नेमळे सिद्धार्थ नगर येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा बौद्धाचार्य प्रकाश जाधव हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक कार्यकर्ते विजय नेमळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर, मार्गदर्शक ममता जाधव, ॲड. सुदीप कांबळे, अशोक कदम, सुनील जाधव, शांताराम असनकर, सिध्दार्थ जाधव व मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी ओंकार कासकर, हर्षल जाधव यांनी स्वरबद्ध केलेल्या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर उद्घाटक विजय नेमळेकर यांच्या हस्ते
प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. नंतर उपस्थित सर्व मान्यवरांना संविधानानुसार शपथ देण्यात आली.
यावेळी उद्घाटक नेमळेकर यांनी गावागावात होणाऱ्या संवाद यात्रेचे कौतुक करून या उपक्रमातून समाजात सुसंवाद निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली. तर अध्यक्ष पदावरून बोलताना बौद्धाचार्य प्रकाश जाधव यांनी ही संवाद यात्रा म्हणजे समाजात परिवर्तन निर्माण करणारी शांती यात्रा ठरो अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रेरणा भूमी चे अध्यक्ष पडेलकर यांनी आत्मभान देण्यासाठीच ही संवाद यात्रा असल्याचे सांगून समाजात तेज आहे पण परिवर्तनाचा वेग कमी असल्याने समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ममता जाधव यांनी भिमगीतातून संगीतमय भाषण केले. अशोक कदम यांनी एकतेतून समतेकडे जाताना पदाची झालर बाजूला काढा असे आवाहन केले तर ॲड. सुदीप कांबळे यांनी सध्याच्या चळवळी या जाती पुरत्या संकुचित होत असल्याची खंत व्यक्त करून जाती अंताचे फारसे कार्यक्रम होत नाहीत यावर नाराजी व्यक्त केली. यावेळी नीलिमा उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनील जाधव यांनी केले, स्वागत शांताराम उर्फ बी. टी. जाधव यांनी केले तर आभार सिद्धार्थ जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम असनकर यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: