नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कि अजून कोण? ठरणार ३० ऑक्टोबरच्या बैठकीत 

​मुंबई: भाजप विधिमंडळ​ ​पक्षाच्या नेता निवडीसाठी येत्या​ ​​३० ​​ऑक्टोबर रोजी भाजपच्या​ ​नवनिर्वाचित आमदारांची बैठक​ ​​होणार आहे. विधानभवनाच्या दहाव्या मजल्यावरील सत्तारूढ​ ​पक्षाच्या दालनात ​होणाऱ्या​ ​बैठकीत ​​नेता म्हणून मुख्यमंत्री​ ​देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर​ ​शिक्कामोर्तब होणार आहे​ कि अजून कोण मुखमंत्री पदासाठी इच्छुक आहे ​हे या बैठकीत ठरणार आहे. चौदाव्या विधानसभा​ ​निवडणुकीत भाजपचे १०५​ ​आमदार निवडून आले आहेत.​ ​२​०१४ च्या तुलनेत भाजपच्या​ ​जागा घटल्याने सरकार स्थापन​ ​करण्यासाठी शिवसेनेला सोबत​ ​घेण्याशिवाय भाजप पुढे पर्याय​ ​नाही.​ त्यामुळे भाजप शिवसेना युती ची पहिली अट ५०-५० फॉर्मुल्या नुसार होणार मुख्यमंत्री पदाची अडीच अडीच वर्ष विभागणी कि नाही हे या बैठकीत ठरणार आहे. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.  ​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: