निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे मैदानात

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक, तालुक्यातील विकास सोसायटी निवडणूक आणि मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. उद्या गुरुवार दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण भाजपा कार्यालयात सभेच आयोजन करण्यात आले आहे. या सभेला माजी खासदार निलेश राणे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व बूध प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख शहर, तालुका कार्यकारिणी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रभारी शहर अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केलं आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: