नाटळ पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल

कणकवली – नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील कोविड रुग्णा साठी उभारण्यात आलेल्या ग्रामविलीगिकरण कक्ष व कोवीड सेंटर चे लोकार्पण आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना श्री राणे म्हणाले,
की नाटळ जि प मतदार संघाने लोकोपयोगी कामाचे एक पाऊल पुढे उचलले असून अदययावत असे कोविड सेंटर व ग्रामविलिगीकरणं कक्ष निर्माण करून सात गावातील ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून संदेश सावंत व संजना सावंत यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक “नाटळ पॅटर्न ” निर्माण केला असून त्याची दखल शासनाने घेऊन अशा कोविड सेंटर निर्माण करावित असे प्रतिपादन आम. नितेश राणे यांनी ग्रामविलीगिकरण कक्ष व कोवीड सेंटर च्या लोकार्पण प्रसंगी केले.प्रस्तावित ३५ बेडचे कोवीड सेंटर सर्व सोयींनी सुसज्ज करण्यात आले असून या कोवीड सेंटरमध्ये सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. २४ तास डॉक्टर व नर्स सेवा उपलब्ध ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, सर्व प्रकारची औषधे व वैद्यकीय साहित्य, जेवण व नाश्ता, दूध, अंडी, सूप इत्यादी पौष्टिक आहार , प्रत्येक रुम मध्ये टीव्ही, अद्यावत बेड सुविधा, स्वतंत्र फॅन, स्वछ व शुध्द पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची सुविधा, आंघोळीसाठी गरम पाणी, इनडोअर खेळाचे साहित्य, वैयक्तिक स्वचछतेचे साहित्य,
कोविड सेंटरचा पूर्ण परिसर CCTV च्या निगराणी खाली असून स्वतः जि प अध्यक्ष सौ संजना सावंत व संदेश सावंत यांचा यावर लक्ष असणार आहे.
नाटळ खादारवाडी शाळेत हे सेंटर सुरू करण्यात आले असून येथे सर्व सोयी सुविधा या लोकसहभागातून घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात बहुदा हे अशा पद्धतीने सुरू झालेले पहिलेच कोविड सेंटर आहे. यावेळी जि प अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, तहसीलदार आर जे पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ, सभापती मनोज रावराणे, उप सभापती प्रकाश पारकर, माजी सभापती सुरेश सावंत, विजय भोगटे, प्रफुल्ल काणेकर, नाटळ सरपंच सुजाता सावंत, नरडवे सरपंच अमिता सावंत, दिगवळे सरपंच सानिका सुतार, दारिस्ते सरपंच संजय सावंत, सांगवे सरपंच मयुरी मुंज, शिवडाव सरपंच वनिता जाधव, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, उपसरपंच रॉबर्ट डिसोझा, कनेडी प्रा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ फाटक उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजित नायर म्हणाले, कि एका ठिकाणी उत्साहाने सात गावे एकत्र येऊन अशा कोविड सेंटर ची उभारणी करतात ही अभिनंदन ची बाब आहे. प्रत्येक गावातील सरपंच व आरोग्य कर्मचारी यांनी असेच काम करून आपला गाव व तालुका कोरोना मुक्त करावा असे आवाहन त्यानी केले. प्रास्ताविकात संदेश सावंत यांनी शासनाने प्रत्येक गावात सेंटर उभारायला सांगितले परंतु या सात गावातील भौगोलिक परस्थितीनुसार विचार केला तर एखादया गावात एक रुग्ण असेल तर त्यासाठी लागणारी यंत्रणा नसल्याने या विभागातील सर्व सरपंच ग्रामसेवक तलाठी मंडळ निरीक्षक आरोग्य कर्मचारी यांनी विचारविनिमय करून या सेंटर ची उभारणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर रुग्ण बरे होऊन घरी जावेत यासाठीच या सर्व सोयींनी युक्त अशा कोविड सेंटर निर्माण केल्याचे सांगितले . सूत्रसंचालन व आभार सुशांत मर्गज यांनी केले यावेळी सर्व सरपंच उप सरपंच ग्रा प सदस्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: