देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या डंपिंग ग्राउंड व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोधच!

देवगड – देवगड तालुक्यातील टेंबवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत होऊ घातलेल्या देवगड जामसंडे नगरपंचायत च्या नियोजित डंपिंग ग्राउंड व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला या पूर्वीही ग्रामस्थांनी विरोध केला होता, आजही आहे, व यापुढेही असेल असा आक्रमक पवित्रा टेंबवली ग्रा.प.सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांनी घेतला असून त्या बाबतचे लेखी पत्र देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांचेकडे शिष्टमंडळाने सादर केले आहे. या पत्रात नमूद केले प्रमाणे नगरपंचायत प्रशासन ग्रा.प. प्रशासक, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेवून नगरपंचयतील नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. असा आरोप या पत्रात करण्यात आला असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असेही नमूद केले आहे. आजपर्यंत या सदर्भातील कोणतेही कागदपत्र विद्यमान सरपंच अथवा सदस्यांना दाखविण्यात आलेले नाहीत. तसेच नाहरकत दाखला, व नगरपंचायत प्रतिज्ञापत्र यांचा ताळमेळ दिसून येत नसल्याचे ही नमूद केले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा आधुनिक स्वरूपाचा असून त्या प्रकल्पात कचरा डंपिंगही करण्यात येणार असून या प्रकल्पाला सरपंच सदस्य व ग्रामस्थ यांचा विरोध असल्याचे नमूद केले आहे. या पत्रावर सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या सह्या आहेत. तसेच यावेळी त्यांचे समवेत प्रमोद गणपत घाडी, प्रभाकर वासुदेव कोयंडे, अजित जनार्दन राणे, हरिश्चंद्र श्रीपाद राणे, दादा पोसम, सदानंद कोयंडे, गणेश हरिश्चंद्र राणे, संजय बोडेकर, अंबर राणे, शशिकांत जाधव, भगीरथ राणे उपस्थित होते.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: