दुरुस्तीसाठी दिलेली बोलेरो पिकप गॅरेजमधून चोरीस

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील  तळवडे बाजारपेठ, सिद्धेश्वर मंदिर नजीक एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी दिलेली बोलेरो पिकप गाडी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. गुरुनाथ रामा आचरेकर रा.म्हाळईवाडी, असे गाडी मालकाचे नाव आहे. दरम्यान या बाबतची तक्रार गॅरेज मालक शैलेश गजानन शेटकर (४०) रा.तळवडे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली.त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: