दशावतारी कलाकार विनायक येरागी यांना युवा कलागौरव पुरस्कार

मालवण : मालवण-दांडी येथील तरुण दशावतार कलाकार विनायक उर्फ गोट्या येरागी याला पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशनचा यावर्षीचा युवा कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विनायक उर्फ गोट्या येरागी या तरुण कलाकाराने स्त्री अभिनयाच्या जोरावर दशावतार कलाक्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे. जिल्ह्यातील अनेक दशावतारी मंडळामध्ये त्याने स्त्री पात्राच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोबरच विनायक हा नृत्य कलेतही पारंगत आहे. विविध क्षेत्रातील संस्थांनी त्याच्या कलेचा गौरव केला आहे. सध्या विनायक श्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ-म्हापणमध्ये काम करीत आहे. येरागी याच्या अल्पावधीतील कलेची दखल घेऊन त्याची युवा कला गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्याचे कला क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

जुबेर खान / कोकण नाऊ/मालवण

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: