त्रिपुरा येथे दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शासनाचे लक्ष वेधले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद , हिंदु जनजागृती समिती , सनातन तसेच भाजपा या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तहसीलदार वेंगुर्ले यांना निवेदन

सावंतवाडी: त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचीत घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशीदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करुन महाराष्ट्रात मालेगाव , अमरावती व नांदेड येथे दंगली झाल्या . पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने ,कार्यालये , गाड्या यांचा विध्वंस केला गेला . याचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निषेध करण्यासाठी तसेच जमावाने केलेल्या हिंसाचाराची उस्फूर्त प्रतीक्रीया म्हणून प्रामुख्याने अमरावती मधील लोक रस्त्यावर उतरले . ते कोणा एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्त्व करत नव्हते . स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले . त्यानंतर पोलिस यंत्रणेकडुन पक्षपाती पणे कारवाई केली गेली .अफवा पसरुन दंगल करणारयांना पाठीशी घालुन स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष केले गेले .


या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ . ०० वाजता तहसीलदार – वेंगुर्ले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व हिंदुत्ववादी संघटना व राष्ट्रप्रेमी जनता सामील झाली होती .
यावेळी दंगल घडवणारया प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तींच्या मार्फत झाली पाहिजे , दंगल घडवणारया सूत्रधारांना अटक झाली पाहिजे , दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे , स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी , हिंदुत्ववादी संघटनेचे नेते – कार्यकर्त्यांवरील पुर्वग्रहदुशीत कारवाई थांबवावी आणि त्यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत , अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .
यावेळी भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,जिल्हा चिटनीस निलेश सामंत , रा.स्व.संघाचे कार्यवाह मंदार बागलकर , अमीत नाईक , बाबुराव खवणेकर , गुरुप्रसाद खानोलकर , विश्व हिंदु परिषदेचे अरुण गोगटे व गिरीष पाठक , आपा धोंड , आशिष पाडगावकर , विजय मोरजकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , महीला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , नगरसेवक धर्मराज कांबळी , नगरसेविका श्रेया मयेकर , सनातनचे प्रताप गावसकर , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , कीसन मोर्चा जि सरचिटणीस बाळु प्रभु , ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर , युवा मोर्चा चे निलय नाईक , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार , रा.स्व. संघाचे वैभव होडावडेकर – सौरभ नागोळकर – महादेव मराठे – सुनील प्रभुखानोलकर – सागर रेडकर – सदानंद रेडकर , महीला मोर्चा च्या रसीका मठकर – आकांक्षा परब , अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख , आनंद ( बिटु ) गावडे , शेखर काणेकर , अरुण ठाकुर , शशिकांत करंगुटकर , संदीप पाटील , अजित नाईक , ओंकार चव्हाण , प्रकाश रेगे , विजय ठाकुर , जगंन्नाथ राणे , सोमकांत सावंत , अनिल गावडे , दयानंद कृष्णाजी , राहुल परब , दिलीप मुळीक इत्यादी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते .

रामचंद्र कुडाळकर, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: