… त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यू वाढले!

सिंधुदुर्गनगरी – जिल्हा रुग्णालयात फिजिशियन नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यु वाढले असल्याच्या गंभीर आरोप केला. कोरोना रुग्णावर नाक, कान, घसा तज्ञ उपचार करीत आहेत, असे सांगत जिल्ह्यात आतापर्यंत किती रुग्ण व्हेन्टीलेटर उपचार घेत असताना व ऑक्सीजन लावल्यानंतर वाचले आहेत, याची माहिती मागितली. तसेच राज्य शासनाने तज्ञ टीम पाठवून याबाबत चौकशी करावी, अशीही मागणी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यानी स्थायी समितित केला.
जिल्हा परिषद स्थायी समितिची सभा सभापती संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव राजेंद्र पराडकर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, शिक्षण व आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी, महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गांवकर, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, गटनेते रणजीत देसाई, विष्णुदास कुबल, संतोष साटविलकर, संजय पडते, अमरसेन सावंत यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निधन झालेल्या सुनील म्हापणकर, माजी सदस्य समीर नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी कोकण नाऊ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: