डोंबिवली कैलासनगर येथे आज महापौर शाहू सावंतसाहेब यांची ५ वी पुण्यतिथी साजरी

मुंबई : ​आज डोंबिवली कैलास नगर येथील शाहू सावंत प्रतिष्ठान कार्यालय येथे महापौर शाहू सावंतसाहेब यांची ​५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.​ ​याप्रसंगी डॉ​.​ सर्वेश शाहू सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला.​ ​तसेच पुण्यतिथीनिमित्त हाजीमलंग रोड, सरोवर नगर येथील अनाथ वृद्धाश्रमात दानधर्म करण्यात आला. या प्रसंगी डॉ​.​ सर्वेश शाहू सावंत,​ ​निनाद सावंत, बाळा कदम,​ ​कैलास पवार, तुषार नाईक, अभय सावंत,​ ​अक्षय परब,​ ​विनायक निवते,​ ​चंदन गुराम, आत्माराम नाटेकर,​ ​संतोष आंबरे, शाहू सावंत प्रतिष्ठानचे ​​कार्यकर्ते​ ​आणि राणे समर्थक ​​कार्यकर्ते उपस्थित होते.

​ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: