ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना ची लागण.. 

मुंबई : ​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली असून त्यांनीच तशी माहिती दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी करोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही केलं आहे.​ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर जलसंधारण मंत्री यशवंत गडाख यांच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याने गडाख होम क्वॉरंटाइन झालेले आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनाही करोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोविड चाचणी केली असता त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असल्याचं आढळून आलं आहे.​


ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: