“झुल्बी” चा डबल धमाका !

सर्वोत्कृष्ट लघुपट
दीक्षा नाईक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

कुडाळ: स्नेहांश एन्टरटे्मेंट प्रस्तुत  “झुल्ब्बी” या लघुपटाने संकल्प सामाजिक ,शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आयोजित “स्टेट लेव्हल शॉर्ट फिल्म फेस्टीवल” या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे  त्या सोबतच या लघुपटात  मुख्य भूमिका साकारणारी कुमारी.दीक्षा प्रमोद नाईक हिला उत्कृष्ट अभिनेत्री (प्रथम क्रमांक) म्हणून गौरविण्यात आले आहे.
    अतिशय कमी वेळेमध्ये प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाणारा आणि अलगद डोळ्यात पाणी आणणारा “झुल्बी” हा लघुपट जास्तीत जास्त लोकांच्या पसंतीस उतरला आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त यू ट्यूब व्ह्यूज आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मिळालेले यश तसेच सर्व कलाकारांनी केलेला प्रामाणिक अभिनय, उत्कृष्ट कथानक आणि दिगदर्शन हि या लघुपटाची  ठळक  वैशिष्ट्य आहेत.


   या लघुपटात कुमारी दीक्षाने केलेल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. सातवी मध्ये शिकणारी कुमारी दीक्षा नाईक ही एक उत्तम नृत्यांगना असून देखील तिने   केलेल्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 त्यासोबतच या लघुपटात  कुमार वेदांत वेंगुर्लेकर,  कुमार निखिल कुडाळकर,  सौ. उत्कर्षा वेंगुर्लेकर,  सौ.कृपा नाईक,  उमेश वेंगुर्लेकर, सुनील डवर या  कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. शेखर गवस हे लघुपटाचे दिग्दर्शक असून सहदिग्दर्शक  सत्येंद्र जाधव आहेत. लेखन  -रामचंद्र कुबल, संकलन-.सिद्धेश खटावकर, छायाचित्रण – तन्मय मत्तलवार, शेखर सातोस्कर, अजय कुडाळकर आणि विलास कुडाळकर, निर्माता – उमेश वेंगुर्लेकर, सह निर्माता – रवि कुडाळकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच संजना पवार,आर्यन चव्हाण, अभिषेक पवार,उपेंद्र पवार या सोबतच स्नेहांश एन्टरटे्मेंट कणकवली आणि झुल्ब्बी फिल्मच्या संपूर्ण टीम यांचा या यशामध्ये मोलाचा वाटा आह
    लवकरच संपूर्ण झुल्ब्बी टीमचा सत्कार हा  वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे होणार आहे. हा लघुपट पहावयचा असल्यास   https://youtu.be/7NL71bopLdA  ट्यूब लिंक वर जाऊन  पाहू शकता. “झुल्बी” च्या या यशाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन होत आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: