झरेबांबरमध्ये एसटीच्या धडकेत मुलगा जखमी

दोडामार्ग : झरेबांबर येथे एसटीच्या धडकेत मुलगा जखमी होण्याची घटना सोमवारी दुपारी घडली. झरेबांबर पिकुळे रस्त्यावर अपघात झाला. स्वप्नील संतोष राठोड ( वय १५ , रा. झरेबांबर ) असे जखमी मुलाचे नाव आहे .
अपघातग्रस्त एसटी ( एम. एच. ०७ सी.७४१७ ) दोडामार्गहून पिकुळेकडे जात होती. रस्त्याच्या बाजूला स्वप्नील उभा होता. त्याला एसटीची धड़क बसली. ती धड़क एवढी जबरदस्त होती की तो रस्त्याच्या बाजूला गटारात जाऊन पडला. त्यानंतर स्थानिक आणि नातेवाईकांनी त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांनी तत्काळ उपचार केले. त्याच्या डोक्याला मुका मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोमेकॉमधे पाठवण्यात आले.

प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: