जेवढे आमचे नगरसेवक फोडले, त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार

निलेश राणेंचा इशारा

सिंधुदुर्ग : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीमधील भाजपचे ७ नगरसेवक शिवसेनेने फोडल्याच्या पार्श्वभूमीवर जेवढे आमचे नगरसेवक फोडले; त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार, असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. वाभवे-वैभववाडीमधील ४ माजी नगराध्यक्षांसहीत ७ नगरसेवकांनी भाजपचा राजीनामा दिला असून हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला हा इशारा दिला आहे. या संदर्भातील ट्विट त्यांनी केले आहे.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: